जिल्हाधिकारी,आयुक्त यांची बदली करा - आर. पी. आय. ची मागणी
schedule29 Aug 20 person by visibility 978 categoryराजकीय

कोल्हापूर -
कोल्हापूरमध्ये सध्या कोरोनाच हाहाकार माजविलेला आहे. त्यामुळे अपयशी जिल्हाधिकारी,आयुक्त यांची बदली करा, या मागणीचे निवेदन आर. पी. आय. आठवले गटातर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
सध्या जिल्हयामध्ये फक्त कोरोना झालेल्या रूग्णाचेच उपचार करण्यावर जिल्हाधिकारी यांनी प्राधान्य दिलेले आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला कोरोना नाही त्या व्यक्तींना हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करून घेण्यास हॉस्पीटल टाळाटाळ करीत आहे. त्यामुळेच अॅड. पंडीतराव सडोलीकर यांना वेळेत दवाखान्यात अॅडमीट करून न घेतल्यामुळे त्यांना त्यांचे प्राण गमवावे लागले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
कोरोना रूग्णांचा उपचार 6 लाखाचे आणि 3 लाखाचे पॅकेज खाजगी रूग्णालयाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस जो पैसे देवू शकत नाही. जिल्हाधिकारी, आयुक्त यांनी संबंधित हास्पिटलवर कोणताही अंकुश ठेवलेला नाही. वारंवार तक्रार देवून देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधितावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हॉस्पीटल मालक हे मनमानी कारभार करत आहेत व मोठया प्रमाणात कोरोना पेशंटकडून देखील रक्कमा घेत आहेत.
मुंबई मधील धारावी सारख्या झोपडपदी मधील जी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये कोरोना आटोक्यात आलेला आहे . परंतु कोल्हापूर सारख्या शहरामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यास जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त हे अपयशी झालेले आहेत. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून नविन कार्यक्षम व तडफदार जिल्हाधिकारी,आयुक्त यांची नेमणूक करणेत यावी आणि या कोरोनाच्या संकटातून कोल्हापूर शहर व जिल्हयाला बाहेर काढावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) शहर कोल्हापूर जिल्हयाच्या वतीने करीत आहोत. यावेळी सतिश माळगे, चरणदास कांबळे, संबोधी कांबळे,प्रवीण निगवेकर, मुरलीधर शिंगे, नितीन कांबळे, सलमान मौलवी, मोहन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.