अशोक कांबळे यांना यावर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कार
schedule04 Apr 25 person by visibility 41 categoryसामाजिक

कोल्हापूर;
येथील कृती फाउंडेशन यांच्यावतीने घुंगुर तालुका शाहूवाडी येथील अशोक दत्तू कांबळे यांना या वर्षीचा आदर्श मुकनायक पुरस्कार देण्यात येत आहे.
कांबळे यांनी शाहूवाडी तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सक्रिय कार्यकर्ता म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. विद्यार्थ्यांना वह्या वाटप, महिलांना साड्या वाटप, या सर्व गरीब रुग्णांना मदत करण्याचे काम त्यांनी केलेल आहे. तालुक्यासह जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वंचित लोकांना न्याय देण्याचा काम केला आहे. त्यासाठी आंदोलन मोर्चे यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे.
प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून आंबेडकरी चळवळ वाढवण्यासाठी त्यांनी कायमच पुढाकार घेतला आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.