ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांचा काळया यादीमध्ये समावेश
schedule24 Apr 25 person by visibility 32 category

ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांचा काळया यादीमध्ये समावेश
महापालिका क्षेत्रात रस्त्याचे दुतर्फा झाडांचे वृक्षारोपण करणे व 2 वर्षाकरीता देखभाल दुरूस्ती करणेकामी कारवाई
कोल्हापूर ता.23 : महापालिका क्षेत्रात रस्त्याचे दुतर्फा 5000 झाडांचे वृक्षारोपण करणे व 2 वर्षाकरीता देखभाल दुरूस्ती करणे कामाचा कार्यादेश सोलापूर येथील ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांना दि.10 ऑक्टोंबर 2024 रोजी देण्यात आला होता. कार्यादेश देऊन बराच दिनावधी होऊन देखील सदर ठेकेदाराने काम सुरु केले नाही. सदरचे काम तातडीने सुरु करणेसाठी ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांना वेळोवेळी तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या नोटशीस ठेकेदार याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. सदरचे काम सुरु करणेबाबत ठेकेदार यांना वारंवार दुरध्वनीव्दारे संपर्क करण्यात आला. यासही ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळला नाही. त्यामुळे या कामाबाबत ठेकेदार नकारात्मक असलेचे निदर्शनास येत असलेने सोलापूर येथील ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांना दि.15 एप्रिल 2025 रोजीने अंतिम नोटीस बजाविण्यात आली होती. सदर नोटीशीस ठेकेदार यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सदर ठेकेदार या कामाबाबत नकारात्मक असलेचे सिध्द होत असलेने या नियुक्त ठेकेदार आकाश उत्तम कानडे यांची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्यात येऊन त्यांचा समावेश काळया यादीमध्ये करण्यात आलेला आहे.