राजगड" शिवसेना शिवाजी पेठ जनसंपर्क कार्यालयाचा उद्या दि.१३ रोजी उद्घाटन सोहळा*
schedule13 Jun 22 person by visibility 98 categoryसामाजिक
*"
कोल्हापूर दि.१२ : शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संघटना आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी समस्त शिवसैनिकांना ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या मूलमंत्राचे बाळकडू दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जनसेवेचे व्रत अखंडित जोपासले आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवसेनेच्या शाखा आणि विभागीय कार्यालये असून, या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचे काम शिवसैनिक करत आहेत. कोल्हापूर शहरातही "शिवालय" शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ या मुख्य कार्यालयासह शिवनेरी विभागीय कार्यालय कसबा बावडा आणि सिंहगड जनसंपर्क कार्यालय मंगळवार पेठ येथून जनसेवेचे व्रत जोपासले जात आहे. कोल्हापूर शहरातील प्रमुख भाग असणाऱ्या शिवाजी पेठ परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी *"राजगड" या शिवसेना जनसंपर्क कार्यालय, शिवाजी पेठ या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते व राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री ना.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या सोमवार दि.१३ जून २०२२ रोजी ठीक सायंकाळी ६.०० वाजता "राजगड" शिवसेना जनसंपर्क कार्यालय, जनता बझार शेजारी, निवृत्ती चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार* असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख श्री.जयवंत हारुगले यांनी दिली आहे.