सुलोचना नार्वेकर यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule05 Mar 25 person by visibility 328 categoryराजकीय

कोल्हापूर
वळीवडे तालुका करवीर येथील सुलोचना नार्वेकर यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे सायंकाळी पाच वाजता पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
नार्वेकर यांनी आतापर्यंत समाजकार्यात मोठा सहभाग नोंदवला. भारतीय जनता पार्टी मोर्चा ग्रामीण जिल्हा सरचिटणीस या पदावर त्या कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. 2011 पासून ताराराणी महिला सेवाभावी संस्था या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.