आरती वैशाली मनोहर कांबळे यांना मूकनायक पुरस्कार कोल्हापूर
schedule02 Apr 25 person by visibility 79 categoryसामाजिक

कोल्हापूर
पाचगाव (ता करवीर) येथील आरती वैशाली मनोहर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रसिद्ध केलेल्या मूकनायक या वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
कृती फाउंडेशन यांच्यावतीने रविवारी (दि.6) सायंकाळी साडेचार वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कांबळे यांची शिक्षण शिवाजी विद्यापीठात मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी पत्रकारितेत पाच वर्ष काम केलेले आहे. त्या सध्या मुंबई पुढारी न्युज चैनल येथे दोन वर्षापासून कार्यरत आहेत.
महिला पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी धडाडीचे काम केलेले आहे. रोख-ठोक लेखन यासह उत्कृष्ट अँकरिंग सुद्धा केलेला आहे. कोल्हापूर सह मुंबई येथे सुद्धा बातमी संपादनाचं काम त्यांनी केले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी घरची परिस्थिती स्वतः खूप चांगल्या पद्धतीने हाताळली आहे.
कांबळे या सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर आहेत. आदर्श विद्यार्थींनी पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल, मराठा जागृती मंचाकडून विशेष पुरस्कार, पाचगाव मंडळाकडून महिला पुरस्कार,कृती फाउंडेशनकडून आदर्श महिला पत्रकार पुरस्कार, कोल्हापूर भूषण युवा पत्रकार पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.