रूपाताई वायदंडे यांना आदर्श महिला पुरस्कार
schedule07 Mar 25 person by visibility 629 categoryराजकीय

कोल्हापूर ;
आंबेडकरी चळवळीच्या नेत्या रूपाताई वायदंडे यांना यावर्षीचा आदर्श महिला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आठ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
आंबेडकरी चळवळीतील प्रत्येकावर मदतीला धावून जाण्याचे ध्येय बाळगत वायदंडे यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. अन्याच्या विरोधात रस्त्यावर त्यांनी अनेक आंदोलन केलीत. वंचित कुटुंबाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. वक्तृत्वाच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करत त्यांनी महिलांच्यावर नेतृत्व सुद्धा केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्या आज राज्यस्तरीय नेत्या म्हणून ओळखल्या जातात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट रित्या कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत आहे.