Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या* *दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड*

schedule30 Jan 25 person by visibility 239 categoryउद्योग

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासकीय सेवा परीक्षा (गट ब) परीक्षेत या दोघांनी अनुक्रमे १५ व १६ वे स्थान प्राप्त करत हे यश मिळवले आहे.
 
प्राचार्य डी. एन शेलार म्हणाले, महाविद्यालयात सुरुवातीपासूनच विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जाता. यामध्ये विविध स्तरामधील तज्ञ यांची मार्गदर्शनपार व्याख्यान, कार्यशाळा, महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेली स्पर्धा परीक्षे साठी लागणारी पुस्तके, सुसज्ज ग्रंथालय या मुळेच विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत आहेत. येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेद्वारे आणखीन विद्यार्थी यश संपादन करून लोकसेवेत रुजू होतील याचा विश्वास वाटतो. कृषि सेवा, वन सेवा, बँकिंग या सोबत आता अन्न व औषध प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत यांचा सार्थ अभिमान असल्याचे त्यानी सांगितले.
 
   महाविद्यालयातील प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी मिळणारी प्रेरणा, तसेच आई वडिलांचे पाठबळ या मुळे या परीक्षेमध्ये यश मिळाल्याचे दोघांनी सांगितले.  
 
   यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes