धनश्री पाटील यांना यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार'
schedule06 Mar 25 person by visibility 992 categoryसामाजिक

कोल्हापूर
येवती तालुका करवीर येथील ग्रामसेविका धनश्री पाटील यांना कृती फाउंडेशन यांच्यावतीने यावर्षीचा 'आदर्श महिला पुरस्कार' जाहीर करण्यात आला. ८ मार्च रोजी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ पार पडणार आहे.
ग्रामसेविका म्हणून काम करत असताना विविध महिलांना प्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले आहे. शासकीय सुविधा घरकुल विविध पेन्शन यासह थेट गावातील महिलांना एकत्रित करत सहकार्य केले आहे.
कौटुंबिक जबाबदारी सांभाळत सामाजिक जबाबदारी सुद्धा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.