Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी*

schedule23 Feb 25 person by visibility 162 categoryउद्योग

*पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू  प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी*

*प्रदर्शनाच्या तीन दिवसात १५ कोटीच्या आसपास उलाढाल*

*३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा, बारा किलो वजनाचा दीड वर्षाचा टर्की कोंबडा*

*हरियाणातील विधायक नावाचा  रेडा,चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण आणि  आप्पाचीवाडी येथील पाच वर्षाचा शंभू बैल (वळू)*साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण*


 *भीमा कृषी पशू प्रदर्शनाच आज शेवटचा दिवस  शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*

*कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री ना.श्री.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सोमवारी होणार समारोप कार्यक्रम*

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून  १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी  शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी  तांदूळाची विक्री झाली आहे.आणि बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी विक्री झाली आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून तीन दिवसात १५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे. आज रविवारच्या दिवशी खाद्य पदार्थ खाण्यासाठी ताव मारण्यासाठी कोल्हापूरकर यांनी मेरी बेदर मैदानावर  गर्दी केली होती.प्रदर्शनाच्या आजच्या  तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी व.कोल्हापूरसह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण  भागातील शेतकऱ्यांनी  तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी केली होती.

भागीरथी महिला संस्थेमार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी मोफत झुणका भाकर गाव तामगाव भागीरथी महिला बचत गटात मार्फत आजची  भाकरी वाटप करण्यात आले.यावेळी मंगल ताई महादेवराव महाडिक, मंगल ताई महाडिक, साधना महाडिक,सौ अरुंधती महाडिक,अंजलीताई मोहिते,आशा जैन, भागीरथी बचत गट महिला सभा सद उपस्थित होते.सायंकाळी गाथा महाराष्ट्राची मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम झाला.आज प्रदर्शन स्थळी माजी आमदार माधवराव माळी खासदार धनंजय महाडिक यांनी भेट दिली.

आज सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता  होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री ना.श्री.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री श्री.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील उपस्थित असणार आहेत.यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्या सह प्रमुख उपस्थिती आमदार.चंद्रदीप नरके,आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर,आमदार
शिवाजीराव पाटील,आमदार अशोकराव माने  उपस्थित असणार आहेत.

कागलमधील हैदर अली बर्ड ब्रिडिंग भीमा अँग्रो फार्म मधील पशू पक्षी
 याठिकाणी पाहण्यासाठी गर्दी होत आहे.यात ३६५ दिवसात ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्टेलियन कोंबडी,*जगातील सर्वात छोटा जापनीज बेंटम कोंबडा,*  टर्की कोंबडा दीड वर्षाचा बारा किलो वजनाचा आहे.* पांढरे ससे, आफ्रिकन बर्ड सिल्की कोंबड्या, चिनी कोंबडी, सोनाली कोंबडी, गिरीराज कोंबडी, परशियन मांजर ची पिल्ले कबूतर लव बर्ड कोकोटोल बर्ड,अमेरिकन बिल्टम जातीचे बोकड तीन वर्ष आठ महिने आणि चार वर्षाची १८ इंचाचे बोकड, कोलंबियन ब्रम्हा एक वर्षाचा कोंबडा त्याचे साडेचार किलो वजन  आहे.गीज बदक,व्हाईट पिक अँन बदक, इंडियन रनर बदक, मस्कवि बदक आकर्षण ठरत आहेत जे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

            *जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा आणि चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण, *आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू सहा फूट उंच आणि सात  फूट लांब आहे बैल (वळू)*,पाच वर्षाची देवणी गाय, साडेपाच वर्षांचे राम आणि रावण नावाचे दोन कंधारी वळू,*आफ्रिकन बोअर शेळी,मीट मास्टर व ड्रॉपर (मेंढी)सानेन शेळी खास आकर्षण ठरत आहेत.*
*अर्जंनि येथील सात किलो वजनाची मैलोडी जातीचे कलिंगड,* शिवाय रेशीम कोष, शंकरवाडी कागल येथील चार किलोचा मुळा, हेरले येथील पावणे सात किलोचा केळीचा घड, कडेगाव येथील ८६०३२  या वाणाच्या  उत्पन्नापेक्षाही ज्यादा उत्पन्न देणारा १३००७ ऊसाची नवीन वाण आकर्षण ठरत आहे. पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय नावाचा हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष  पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई  प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो  वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती भीमा कृषी प्रदर्शनात मिळत आहे. व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता येत आहेत. 


*पीक स्पर्धा निकाल*
*फुले*

१)जयदीप दशरथ पाटील (रा.शिंगणापूर शेवंती)

 २)विनायक आनंदा कांबळे (रा.पाडळी खुर्द जरबेरा)

 ३)शशिकांत शेवाळे (रा. शंकरशेंदुर झेंडू)

*धान्यपिके*

 १)राजू देऊ बने (रा तारदाळ ज्वारी)

 २)प्रशांत करणे (रा.गडहिंग्लज ज्वारी)

 ३)चेतन लोखंडे(रा. अरळ गुंडी भात तांदूळ)

*कडधान्य पिके*

१)संजय भक्ती (रा.भडगाव हरभरा)

 २)सौ सुरेखा सुतार (रा. आरशी घेवडा)
 ३)ओंकार अनिल पाटील (रा.गिरगाव वाटाणा)

१)अमोल बळवंत पाटील (रा. शिरोली ऊस)
 १)रोहन प्रमोद चौगुले (रा. यळगुळ केळी)
 २)महादेव शामराव पाटील (रा. चिखली लिंबू)
३)कुंडलीक कृष्णा डाफळे (रा. हंबरवाडी पपई )
४)अनिल संभाजी भाचे (रा.सावर्डे स्ट्रॉबेरी)

*भाजीपाला*

१)प्रदीप येलगुंडा खोत (वांगी)

 २)अविनाश मारुती जाधव (ढोबळी मिरची)

३)आनंदा पावले (मिरची)

४)अजित थोरात (मिरची)

*बोलवर्गीय भाजीपाला*

नंदिनी दिनकर देसाई (कलिंगड)

निवास पाटील (काकडी)

अथर्व चौगुले (कोहळा)


 *विधायक नावाचा  रेडा खास आकर्षण पाहण्यासाठी लहान मुलांसह लोकांची गर्दी*

*जगातील सर्वात उंच पानिपत हरियाणातील पद्मश्री नरेंद्रसिंग यांचा ४ वर्षाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा विधायक नावाचा रेडा भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.गोलू २ रेड्याचा हा मुलगा असून  या रेड्याचे वजन जवळजवळ दीड टन आहे. हा विधायक १४ फूट लांब आणि साडे साडेपाच फूट उंच आहेत्या रेड्याची किंमत २५ करोड रुपये असून प्रतिदिन २० किलो दूध २० किलो फीड आणि ३० किलो चारा आणि भुसा खातो.त्याचे राहणीमान ऋतुमानानुसार असते गर्मीमध्ये त्याला एसी आणि पंख्याची आवश्यकता असते.त्याच्या अंघोळीसाठी खास स्विमिंग पूल पानिपत येथे बांधण्यात आलेला आहे या रेड्याच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला मोठ्या प्रमाणात उत्पन्न बीज प्रक्रियेतून प्राप्त होते. सर्वांनाच बघण्यासाठी आणि त्याच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी मिळते.विधायक रेड्याने महेंद्रगड, रोहतक,मेरठ उत्तर प्रदेश या तीन ठिकाणी गोलू टू म्हणजेच आपल्या वडिलाला स्पर्धेमध्ये हरविलेले आहे. २०१९ मध्ये सरकारने याला पद्मश्री किताब देऊन गौरविले आहे.असा हा विधायक नावाचा रेडा २०२५ च्या भीमा कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.*


*चायना झिंग जातीचा बोकड आकर्षण*


*चायना येथून आणण्यात आलेला कवठे महांकाळ येथील राकेश कोळेकर यांचे तीन वर्षाचे सुलतान नावाचे चायना झिंग जातीचे बोकड हे प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.३० किलो वजनाचे हे बोकड असून त्याच्या अंगावर पूर्ण पांढऱ्या रंगाचे केस आहेत.त्याची लांबी ५ फूट,उंची १ फूट ८ इंच,आणि  शिंगे १ फूट ४ इंच  आहे.*

*फुलशेतीची माहिती*

*वाळवे खुर्द येथील शंभर टक्के हेकरासाठी चार लाख रुपये अनुदान रेशीम उद्योगासाठी कोश उद्योगासाठी शासनाकडून दिले जात आहेत दिले जाते या रेशीम कोशसाठी वर्षातून चार बॅचेस निघतात एका बॅचमध्ये १०० किलो कोष निघतो एका किलोचा दर ६०० रुपये असतो हा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्यवसाय आहे.याचे मार्गदर्शन मिळत आहे.याचबरोबर ४  किलोचा मुळा हेरले येथील अमोल चौगुले यांचा पावणेसात किलोचा केळीचा घड, तेराशे सात उसाचे पाडगाव येथील वाण अर्जंनि येथील सात किलो मैलोडी जातीचे कलिंगड,६.८०० किलो वजनाचा कोहळा,पाच किलोचा चकाट कोबी, अडीच फूट लांब असलेला दिग्विजय हरभरा, ऑर्किडची फुले, गडहिंग्लज येथील रेवती जातीची ज्वारी, भडगाव गडहिंग्लज सुभाष  पाटील यांचा ऑर्किड पांढरी गुलाबी फुले, पोकचाई  प्लेट्यूस कोबी,भडगाव येथील उसातील आंतरपीक घेण्यात आलेला मका कणीस, नरसिंह वाडी ची सेलम नावाची हळद कागल येथील अर्धा किलो  वजनाचा कांदा,प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.*

 

*जनावरे आकर्षण*

*भीमा फार्म मधील पांढरे घोडे, पुंगनूर जातीची चार वर्षाची अडीच फूट तीन गाई* *नांदेड येथील अजय विश्वनाथ जाधव यांचा राम आणि रावण नाव असणारे साडेपाच वर्ष  असणाते लाल कंधारी वळू खास आकर्षण ठरत आहेत याचबरोबर चेतक सहा वर्षाचा घोडा, बेळगाव येथील सुजित शिवकुमार देशपांडे फार्म मधील मैशी आणि घोडे पंढरपुरी जातीचा रेडा हासेगाव वाडी लातूर येथील पाच वर्षाची देवणी गाय, आप्पाचीवाडी येथील विजय जाधव आणि सागर चौगुले यांचा पाच वर्षाचा शंभू बैल आकर्षण ठरत आहे तो  सहा फूट उंच आणि सात  फूट लांब आहे.कोगील बुद्रुक येथील साडेतीन वर्ष वय असलेला सहाफूट उंची असलेल्या सोन्या नावाचा  बैल आकर्षण आहे. शिवाय लातूर येथील तीन वर्षे वयाचा सहा फूट उंची असलेला देवणी जातीचा बैल (वळू) आकर्षण ठरत आहे*

          या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत  स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली गेली आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. ताव मारण्यासाठी नागरिक,शेतकरी कुटुंबासह याठिकाणी गर्दी करत आहेत.शेतकऱ्यांना आजही भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरीचे वाटप  करण्यात आले.

*कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने भीमा कृषी प्रदर्शनात मांडण्यात आलेले प्रोजेक्ट खालीलप्रमाणे*

ऊस उत्पादन वाढीसाठी सुपर केनर्सरी द्वारे ऊस रोप तयार करणे,
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गतसामूहिक शेततळे प्लास्टिक आच्छादन हरितगृह कांदाचाळ रायपनिंग चेंबर शीतगृह पॅक हाऊस शेडनेट हाऊस फलोत्पादन यांत्रिकीकरण,
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड बांधावर फळबाग लागवड गांडूळ युनिट नाडेफ कंपोस्ट युनिट,पौष्टिक तृणधान्य ज्वारी नाचणी राजीगरा बाजरी वरई याच्या आहारातील महत्त्व,वैयक्तिक शेततळे क्षारपड जमीन सुधारणा माती नमुना काढणे,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान,महाडीबीटी अर्ज एक योजना अनेक,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन.ड्रोन माध्यमातून शेती कशी करावी याचीही माहिती दिली जात आहे.

*सहभागी कंपन्या*

विला पंप, पॉप्युलर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट, समृद्धी ट्रॅक्टर अँड मशिनरीजे, लक्ष्मी पंप, टाटा सोलर, तालोड फूड्स,चितळे डेअरी, कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन ,गोविंद मिल्क प्रॉडक्ट, वनिता ऍग्रो केम, जैन इरिगेशन लि, विजय कृषी अवजारे, स्वाती मसाले,बाहुबली प्लास्टिक, डेक्कन फार्म इक्विपमेंट, जीएनपी ऍग्रो केअर सायन्स आदी नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.या कंपन्यांची  उत्पादने शेती साहित्य पाहावयास मिळत आहेत.आणि त्यांची खरेदी केली जात आहे.याचबरोबर हळद टाकली काजू तर मिल्कचे पदार्थ कापड लोणची यांची जोरदार विक्री होत आहे शेतकरी वर्ग आवश्यक साहित्य खरेदी करण्याकडे वळला आहे.

*आज झालेली व्याख्याने*

आज २३ फेब्रुवारी रोजी माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर डॉ. संजय आसवले यांनी  किफायतशीर दुग्ध व्यवसाय कसा करावा या विषयावर बोलताना दुधाकरिता गायी व म्हैशी कोणत्या निवडाव्यात प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये याची सविस्तरपणे माहिती दिली. जनावरांचा गोठा कसा असावा आदर्श गोठ्यामुळे दूध उत्पादनात वाढ होते. जनावरांची गोठ्यातील बांधणी शेपट्याकडे शेपूट असावी. दुधाळ जनावरांची लक्षणे अधिक दूध कोणत्या गाई किंवा म्हशी पासून  मिळू शकते याची गुणवत्ता आणि गुणवैशिष्ट्ये कशी असावीत ही माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
पशुखाद्य व खनिज खाद्य कोणत्या प्रकारे आणि वय व दुधाने सर किती द्यावे याची माहिती दिली. कोणत्या प्रकारच्या वैरणी आणि  दुधाची निगडित खाद्य द्यावे. दैनंदिन जनावरांची निगा कशी करावी आजारी असल्यास त्याचे संगोपन कसे करावे कधी बाबी  सखोलपणे मांडले.
तर डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर याविषयी बोलताना शेतीची आव्हाने व उपाय योजना याविषयी माहिती दिली. पिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे आणि जमिनीच्या पृथकरणांनुसार रासायनिक खते व सेंद्रिय खतांचा वापर आणि  जैविक खते विद्राव्य खते पीक वाढीनुसार द्यावीत. जीवामृताचा वापर तीन ते पाच वेळा करावा. व्हिएसआय १८१२१, खुले  १५०१२,१३००७,१५००६ अशा शिफारस केलेल्या ऊस वानांचा हंगाम निहाय लावण करावी. निश्चितच एकरी सात त्यांना तन पेक्षा जास्त उत्पादन मिळू शकते. तसेच एआय  तंत्रज्ञानाचा वापर करून  अचूक व मोजकेच व्यवस्थापन करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते. याविषयी प्रशिक्षण व्ही एस आय पुणे येथून दिले जाईल निश्चितच त्यामुळे दीडपट उत्पादनात वाढ होऊ शकते. मार्गदर्शन केले.

*उद्या २४ फेब्रुवारी होणारे व्याख्यान*

 पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर हे ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग.

*उद्या समारोप प्रसंगी दिले जाणारे पुरस्कार*

        या प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, जनावरे यांच्या स्पर्धांना  बक्षीसे दिली जाणार आहेत.


         आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जात आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण  आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी  आदि नमुनांचे तांदूळ  आहे आज पहिल्याच दिवशी तांदळाची  तसेच नाचणी सेंद्रिय गूळ,हळद यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.
विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी - बियाणे पाहाव्यास मिळत आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाई, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीचे घोडे, विविध जनावरांच्या जाती  पहावयास मिळत आहेत. हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही प्रचंड होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मध, जाम,काजू,बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे
आज सायंकाळी प्रदर्शन स्थळी तोबा गर्दी लोकांनी शेतकऱ्यांनी केली होती.

         प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग  महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन आज शेवटचा  दिवस असून शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन.
        सुजित चव्हाण
हाऊस ऑफ इव्हेंट यांनी कृषी प्रदर्शन २०२५ चे  उत्कृष्ट प्रकारचे नियोजन केले आहे.या प्रदर्शनासाठी प्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,किरण रणदिवे,प्रमोद खोपडे,सचिन पाटील कृषी विभागाची टीम आदी परिश्रम घेत आहेत.


*सेंद्रिय गुळाला मागणी*

प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गुळाची विक्री झाली  सेंद्रिय गूळ खरेदी करण्यावर लोकांनी अधिक भर दिला  आहे.

भीमा कृषि प्रदर्शनात धान्य महोत्सव दालनात तीन दिवसात विक्री झालेला शेतमाल : 

1) सेंद्रीय गूळ : २५०० kg
2) इंद्रायणी तांदूळ : ४५०० kg 
3) आजरा घनसाळ : ३८०० kg 
4)रत्नागिरी २४ तांदूळ : ३००० kg 
5)सेंद्रीय हळद : ११५० kg  
6)नाचणी : १०००kg
7)विविध बी बियाणे  १२०० किलो

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes