अण्णा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी वीर फकिराचे वंशज मा.सौरभ साठे यांची निवड
schedule24 Feb 25 person by visibility 295 categoryराजकीय

*अण्णा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षपदी वीर फकिराचे वंशज मा.सौरभ साठे यांची निवड*
वाठार :-
आज दि. २३/२/२०२५ रोजी तळसंदे येथे अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित केलेल्या कार्यकरणी बैठकीत मध्ये महानायक क्रांतीवीर फकिरा राणोजी साठे यांचे वंशज मा. सौरभ प्रकाशराव साठे( भाऊ ) यांना अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे सर, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रवक्ते राज्य कार्याध्यक्ष्य आनंदा फाळके, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा. सुरेश चव्हाण, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य हातकलंगले तालुका अध्यक्ष मा रोहित सुवासे, अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका कार्याध्यक्ष गणेश पवार, निलेश महापुरे, विश्वास सुवासे, गोरख सावंत, सुनील दावणे, आकाश कांबळे, नेताजी मस्के आदी पदाधिकारी अण्णा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य प्रवक्ते राज्य कार्याध्यक्ष्य आनंदा फाळके यांनी उपस्थित सर्वांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले आपल्याला हे कार्य या मातीचे ऋण फेडण्यासाठी करायचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून एकत्र पणे काम करू समाजातील प्रत्येक तरुणाने शिक्षण क्षेत्रात मध्ये प्रगती करावी व त्याच बरोबर व्यवसाय करावा. सर्वांनी प्रा डॉ. अमोल महापुरे सरांच्या मार्गदर्शन मध्ये आपले काम करण्याची शपथ घेतली आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित सुवासे यांनी केले.तर आभार विश्वास सुवासे यांनी मांडले.