Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पुरेसा खत साठा उपलब्ध

schedule10 Feb 25 person by visibility 212 categoryलाइफस्टाइल

*

*कोल्हापूर*,  (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२४-२५ रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यासाठी खतांची उपलब्धता व वाटपाबाबत नियोजन करण्यात आले असून मंजूर आवंटनाप्रमाणे जिल्ह्यात खताची पुरेशी उपलब्धतता करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी सुशांत लव्हटे यांनी दिली आहे.

                रब्बी हंगामातील मंजूर आवंटन (८ फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत खताची उपलब्धतता) याची आकडेवारी मे. टनामध्ये पुढीलप्रमाणे- युरिया 55649 (21446), डिएपी 13263 (10038), एमओपी 11449 (10583), संयुक्त खते 51460 (38778), एसएसपी 31824 (14051), एकूण खते 163645 (122423) टन याप्रमाणे आहे.

                 या खतापैकी ८ फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत जिल्ह्यामध्ये शिल्लक खतसाठा पुढीलप्रमाणे- युरिया 21446, डिएपी-2521, एमओपी -5131 संयुक्त खते - 20775, एसएसपी - 6486 एकूण शिल्लक खते - 56414 मे.टन आहे. यापुढेही जिल्ह्यास गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल असे नियोजन करण्यात आल्याचेही कृषी विभागाने कळविले आहे.
                 कृषि विभागाने जिल्ह्यातील सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना तक्रारीच्या अनुषंगाने कृषि निविष्ठा विक्रेत्याच्या तपासण्या सुरू आहेत. त्या अन्वये संपूर्ण जिल्हयात १३ भरारी पथकामार्फत तपासण्या सुरू आहेत. तपासणी अंती दोषी आढळणाऱ्यांवर खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत कडक कारवाई करणेबाबत जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर यांनी आदेशित केले आहे. सदर बाबीच्या अनुषंगाने खत समन्वय सभा घेण्यात अली सदर सभेस खत उत्पादक कंपनी प्रतिनिधी, निविष्ठा विक्रेते, सुशांत लव्हटे, मोहीम अधिकारी, कोल्हापूर, संभाजी शेणवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कोल्हापूर, शरद शिंदे , कृषि अधिकारी, पंचायत समिती, पन्हाळा आणि गौरी जंगम, कृषि अधिकारी, पंचायत समिती, कागल हे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes