प्रकाश कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार
schedule04 Apr 25 person by visibility 64 categoryसामाजिक

कोल्हापूर; येथील कृती फाउंडेशन यांच्या वतीने चंदुर (ता. हातकणंगले) येथील प्रकाश शंकर कांबळे यांना आदर्श मूकनायक पुरस्कार देण्यात येणार आहे. रविवारी (दि.6) साडेचार वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे.
कांबळे यांनी यापूर्वी इचलकरंजी कामगार आघाडीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे संघटक म्हणून सुद्धा सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी तिने कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप यासह त्यांची ने-आण करणे, यासह विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे.
आंबेडकरी चळवळीत सहभाग असल्याकारणाने त्यांचा मानगाव परिषद या ठिकाणी सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे. यासह पार्टीच्या संविधान जागृती उपक्रमात सुद्धा त्यांनी सहभाग नोंदविला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून सुद्धा त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानपत्र देण्यात आलेले आहे. प्रहार या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.