Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

अण्णा ब्रिगेडचे संस्थापक डॉ.अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

schedule04 Feb 25 person by visibility 337 categoryलाइफस्टाइल

*
मुक्ता फौंडेशन आणि अण्णा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल महापुरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी 
केखले ता.पन्हाळा येथील कन्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर खेळाडू असणाऱ्या विद्यार्थिनींना खेळाडू किटचे वितरण करण्यात आले. कुमार विद्यामंदिर केखले येथे येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्याचबरोबर गावातील महिलांना पिको फॉल मशीन मंजुरीचे पत्र देखील देण्यात आले. दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही शाळेतील शिक्षक, विद्यार्थी लाभार्थी महिला दिव्यांग व्यक्ती यांच्यासह अण्णा ब्रिगेड आणि मुक्ता फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोखले ता.पन्हाळा येथील विद्या मंदिर, पोखले या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सर्व संयोजन बबलू वडर सर, मुख्याध्यापक मॅडम व सर्व शिक्षक वर्ग यांनी केले.
देवाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिवाळी येथील महिलांना पिको फॉल मशीन मंजुरीचे पत्र देखील वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींना सायकल मंजूर पत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी महिला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातवे पैकी शिंदेवाडी तालुका पन्हाळा या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यावेळेस शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. 
कोडोली ता पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटे यांची वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
आजरा तालुक्यातील कोळिंद्रे या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आजरा तालुक्यातील अण्णा ब्रिगेड व मुक्ता फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गडहिंग्लज तालुक्यातील हॉलीबॉल संघांना हॉलीबॉलचे वितरण करण्यात आले. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.अमोल महापुरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून व फोन द्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
*यावेळी हातकणंगले तालुकाध्यक्ष रोहीत सुवासे , पन्हाळा शाहूवाडी विभागीय अध्यक्ष सचिन पवार*, अण्णा ब्रिगेडचे नेते शलमोन लोखंडे, कोडोली शहराध्यक्ष विश्वजीत भोसले,उपाध्यक्ष विजय पाटोळे, बबन सराटे,निलेश महापुरे, दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष गोरख सावंत, मंगेश सुवासे , सुहेल सुवासे  , सम्राट सुवासे , वारणा कोडोली शहराध्यक्ष विश्वजीत भोसले, साईराज भोसले , आर्यन भोसले , श्रीकांत पाटील, भटक्या विमुक्तांचे नेते भटक्या विमुक्तांचे नेते भीमराव साठे बापू, सुरेश महापुरे, राजाराम महापुरे, सुनील पाटील, धनंजय कुलकर्णी, आप्पासो शिंदे, पांडुरंग सुतार, निवृत्ती महापुरे,विश्वास कार्वेकर, बाबुराव पाटील, नितीन पाटील, पांडुरंग नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes