Swayam
Unique Platform for Individuals and Entities
Register

जाहिरात

 

झारखंड बाहेरील राज्यात हे कधी होणार

schedule26 Sep 20 person by visibility 978 categoryसंपादकीय

झारखंडमध्ये दहावी व बारावी परीक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांना मा शिक्षणमंत्री महोदयांनी  आल्टो कार भेट देऊन कमाल केली.झारखंड बाहेरील राज्यात हे कधी होणार ????
          महाराष्ट्रात मंगेश मस्कर हा झोपडपट्टीत रहाणारा विद्यार्थी राज्यात पहिला आल्यावर महाराष्ट्राचे तेंव्हाचे शिक्षणमंत्री  कै मा विलासरावजी  देशमुख यांनी मंगेशला मुंबईत फ्लॅट भेट दिला होता
              यावर्षी मध्यप्रदेशातील इंदौर मधील फूटपाथवर राहून ६२% गुण मिळविणारी भारती खांडेकर हिला इंदोर महानगरपालिकेच्या  आयुक्तांनी 1BHK फ्लॅट, पुस्तके, स्टडी टेबल ,खुर्ची व कपाट भेट दिले होते
          झारखंड राज्यातील दहावीचा  निकाल जाहीर झाला. मनिषकुमार कटियार हा विद्यार्थी मॅट्रीक स्टेट टॉपर  आला. बारावीचाही निकाल जाहीर झाला. अमितकुमार हा विद्यार्थी इंटर स्टेट टॉपर आला. दोन्ही विद्यार्थ्यांना झारखंड विधानसभेचे अध्यक्ष मा रवींद्रनाथ महंतो यांच्या उपस्थितीत दोघांना आल्टो कारच्या चाव्या प्रदान केल्या
          परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये लागला असला तरी हा कार्यक्रम झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक मा  बिनोद बिहारी महंतो यांच्या जयंतीदिवशी घेण्यात आला
        झारखंडचे शिक्षणमंत्री  मा जगरनाथ महंतो यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले,"मी टॉपर्सना आल्टो कार  विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळण्यासाठी दिली आहे.कार हे माणसांचे स्वप्न असते. भविष्यकाळात विद्यार्थी जास्त मेहनत घेऊन यश मिळवितील यासाठी कार गिफ्ट दिली आहे.मुलांनी ड्रायव्हींग लायसन काढल्या नंतरच कार चालवायची आहे हा सल्लाही  त्यांनी दिला
        मनिषकुमार कटियार दरघाटचा रहिवाशी आहे.त्याला ५०० पैकी ४९० गुण मिळाले आहेत. अमितकुमार याला जे ई ई मेन्समध्येंही चांगले गुण मिळाले आहेत. अमितकुमार म्हणाला," शिक्षणमंत्री महोदय यांनी आल्टो कार भेट दिल्यामुळे आणखी मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली". दोघांचे पालक म्हणाले," मुलांनी  अभ्यासासाठी खडतर प्रयत्न केल्यामुळे यशाबरोबर बक्षीस मिळाले"   
         राज्यकर्त्यांना शिक्षणाप्रती आस्था असेल, गुणवंत विद्यार्थ्यांप्रती कौतुक वाटत असेल तरच असले कार्यक्रम होतात.शालेय वयात मुलांना कार गिफ्ट मिळणे ही मुलांसाठी सर्वात मोठी आनंददायी गोष्ट आहे.  महाराष्ट्रात किमान पुढील वर्षी दहावी व बारावी बोर्डपरीक्षेत टॉपर असलेल्या मुलांसाठी/मुलिंसाठी फ्लॅट वा कार भेट दिल्यास नक्कीच भाग्याचा दिवस ठरेल.
           तत्कालिन महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री महोदय कै विलासरावजी देशमुख, मध्यप्रदेश इंदौर मनपाचे आयुक्त व झारखंडचे शिक्षणमंत्री महोदय जगरनाथ महंतो यांच्या मनाच्या मोठेपणास  व दातृत्वास साष्टांग नमस्कार
- संपत गायकवाड ( माजी सहाय्यक शिक्षण संचालक) 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Swayam.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes